(चिपळूण)
तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 98.36% लागला आहे. विद्यालयातून 306 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी 301 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 85%पेक्षा जास्त 25 विद्यार्थ्यांनी यश संपादन करीत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
प्रशालेतील कु.कदम दर्शन ओमप्रकाश याने 97.80% घेत विद्यालयात प्रथम क्रमांक व सह्याद्री शिक्षण संस्थेत तृतीय क्रमांक पटकावला. कु.जाधव सायली सुनिल 97.00% प्राप्त करत द्वितीय क्रमांक तर कु.पवार ओम संजय याने 96.80% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रशालेच्या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, आमदार श्री.शेखरजी निकम, संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक, संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.शांताराम खानविलकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर, पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील व पर्यवेक्षिका सौ.आसावरी राजेशिर्के, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.