पलपब पब्लिकेशन अहमदाबाद ( गुजरात ) या प्रख्यात संस्थेच्या पलपब सातारा समिती द्वारा आयोजित ‘अजिंक्य साहित्य संगम’ राज्यस्तरीय साहित्य संमेलनामधे कवी – लेखक – समाजसेवक सुनील चिटणीस यांना त्यांचे साहित्यिक कार्य हे उत्कृष्ठता, समर्पण आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण आहे व समाज क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे, याची नोंद घेऊन त्यांना “पलपब समाजभूषण पुरस्कार व सन्मानपत्र” प्रदान करून नुकतेच गौरविणेत आले.
सदरील पुरस्कार सौ लीना पाटील कार्यकारी अधिकारी, श्री सुरेश शिंगटे उदघाटक, रेखा दीक्षित व श्री प्रदीप कांबळे प्रमुख पाहुणे, श्री अनील बोधे अध्यक्ष, यांचे शुभ हस्ते देणेत आले. स्वराज कॉन्फरन्स हॉल अँड लॉन्स – कोडोली जिल्हा सातारा येथे हा समारंभ संपन्न झाला. या सोहळ्याला अनेक जेष्ठ साहित्यिक तथा कवी – लेखक, साहित्यप्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते. साहित्य क्षेत्रात सुनील चिटणीस यांना “पुस्तकरत्न” पुरस्काराने यापूर्वीच गौरविणेत आले असून “समाजभूषण” हा दुसरा पुरस्कार बहाल करणेत आला आहे.
लघुउद्योग क्षेत्रात महाराष्ट्र शासनाने १९९० साली त्यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासन गौरव चिन्ह या पुरस्काराने सन्मानित करणेत आले आहे. सुनील चिटणीस हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज रत्नागिरी जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत व त्या समाजाप्रती त्यांचे कार्यही उल्लेखनीय असेच आहे. समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.