(रत्नागिरी)
सार्वजनिक ठिकाणी मद्यपानासारख्या गैरकृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कारवाईची कडक भूमिका घेतली असून, सोमवार ५ मे रोजी तालुक्यातील दोन ठिकाणी अशा प्रकारांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. कोतवडे-सनगरेवाडी आणि पावस-जुवेवाडी येथे सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायल्यानं संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोतवडे येथील कारवाईत, सुरेश बाबू ठोंबरे (वय ५५, रा. सनगरेवाडी, रत्नागिरी) या व्यक्तीने दुपारी १२.३० वाजता कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी रूपेश भिसे यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली.
दुसऱ्या घटनेत, पावस येथील जुवेवाडी येथे मोकळ्या जागेत दारू पिणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ बाब्या मधुकर पाटील (वय ५८, रा. पावस जुवेवाडी) याच्याविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायंकाळी ६.३५ वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिस फौजदार महेश मुरकर यांनी तक्रार दाखल केली आहे.