(रत्नागिरी)
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा निकाल 98.53 टक्के लागला. यात कला शाखा 96.99 टक्के, वाणिज्य आणि एम.सी.व्ही.सी विभाग 100 टक्के आणि विज्ञान शाखा 98.27 टक्के निकाल लागला.
कला शाखेत प्रथम क्रमांक स्वरा अरुण मुळये (95.83), द्वितीय क्रमांक अदिती मिलिंद जोशी (95.50) तृतीय क्रमांक स्वरा शैलेश पाटणकर (93.33) हिने मिळवला. वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मधुरा दिगंबर करमरकर (97.50), द्वितीय क्रमांक आदित्य मनिष पानगले (97.00), तृतीय क्रमांक शर्वाणी समीर दामले (96.00) हिने मिळवला.
विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक धनश्री निलेश वैशंपायन (92.67), द्वितीय क्रमांक अंकुर अमित घारपुरे (89.83), पार्थ प्रफुल्ल बोरकर (89.83) आणि तृतीय क्रमांक सारंग मंदार जोशी (88.00) याने मिळवला. एम.सी.व्ही.सी विभागात प्रथम क्रमांक रफा खालीद दवे (92.67), द्वितीय क्रमांक मारिया राहील भाटकर (90.67), तृतीय क्रमांक सेजल अजय आजगेकर (90.00) यांनी मिळवला.
शाखा प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण
कला 266 258
वाणिज्य 384 384
विज्ञान 578 568
एम.सी.व्ही.सी. 63 63
एकूण 1291 1273
मानसशास्त्र विषयात 3 विद्यार्थ्यांना, संस्कृत विषयात 14 विद्यार्थ्यांना, आयटी व इलेक्टॉनिक्स या विषयात प्रत्येकी एका विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण प्राप्त झाले आहेत. वाणिज्य शाखेत 90 टक्केपेक्षा जास्त गुण असणार्या विद्यार्थ्यांची संख्या 32 आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शालेय समिती अध्यक्ष आनंद देसाई व संस्था पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनिल गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर व सर्व विभागप्रमुखांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
मधुरा करमरकर हिने सांगितले की, आमच्या सर्व शिक्षकांनी वर्षभर आमच्यावर भरपूर मेहनत घेतली व आम्हाला उत्तम मार्गदर्शन केले. मला व माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना इयत्ता बारावीमध्ये खूप छान गुण मिळाले आहेत याचे श्रेय आमच्या शिक्षकांना व पालकांना जाते. वाणिज्य शाखेतील बारावीनंतर उपलब्ध असणाऱ्या संधीबद्दल सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करण्यात आले. यानुसार मी सीए करण्याचे ठरविले आहे.
स्वरा मुळ्ये हिने सांगितले की, आज निकाल कळल्यावर अर्थातच आनंद झाला. माझा बारावीतील हा प्रवास अविस्मरणीय आहे. या वाटचालीत माझे आईवडील, विभागप्रमुख, वर्गशिक्षिका आणि आजपर्यंतचे इतरही अनेक शिक्षक यांचा मोठा वाटा आहे.