( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल यावर्षी देखील शंभर टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा या वर्षी देखील कायम राखल्याने संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के प्रथम – दळवी अथर्व राजेंद्र ७०:६७%, द्वितीय – चव्हाण भूमी हर्षानंद ६५%, तृतीय – जाधव आयुष सुशांत ६४:३३%, चतुर्थ – घाग ओम योगेश ६२%, पाचवा – सुतार कृष्ण तुलसी वीरेंद्र ५९%
कला शाखा निकाल शंभर टक्के – प्रथम खापरे रीना संदीप ५४:६७%, द्वितीय – धोपट राहुल हरिश्चंद्र ५४:३३%, तृतीय – गुरव श्रेयस विनोद ५३:३३%, चतुर्थ – पवार अलिषा धनाजी ५०:८३%, पाचवा – कदम सिद्धी संजय ५०:६७%
वाणिज्य शाखा निकाल शंभर टक्के प्रथम – बावधने साक्षी सुरेश ७५:६७%, द्वितीय – गोंणबरे प्रतीक दीपक ६५:५०%, तृतीय – लिंगायत स्वरूप विजय ६५:५०, चतुर्थ – धामणाक ऋतिक अनिल ६५:१७%, पाचवा – फटकरे सायली संतोष ६४:१७