(गणपतीपुळे / वैभव पवार)
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी यांचेवतीने श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 14 मे रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धा तालुक्यातील नारशिंगे येथील छावा प्रतिष्ठानच्या रंगमंचावर होणार आहे. या स्पर्धेसाठी कोणत्याही ऐतिहासिक नाटकातील, एकांकिकेतील अथवा स्वरचित उतारा चालणार आहे. तसेच सादरीकरणासाठी सात मिनिटे ठेवण्यात आली आहेत ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मर्यादित राहणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 2222 चे पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह तर द्वितीय क्रमांकासाठी 1555 चे पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह तर तृतीय क्रमांकासाठी 1111 चे पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी रुपये 100 प्रवेश नोंदणी फी ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी छावा प्रतिष्ठानचे सदस्य प्रथमेश पवार मोबाईल क्रमांक 84 46 43 37 49 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.