(रत्नागिरी)
आज महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कार्यरत असून देखील महाराष्ट्राचा व त्याच परीने देशाचा विकास कशारिती होईल याचा विचार करत असताना आपणही संस्कृत भाषेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देऊयात असे प्रेरणादायी प्रतिपादन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी केले. ते रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात आयोजित महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संचालक डॉ दिनकर मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिवाय कामगार दिनाच्या निमित्ताने संचालक डॉ दिनकर मराठे यांनी कामगार देशाचा पाया असल्याचे मत व्यक्त केले त्यामुळे त्यांच्या प्रति प्रत्येकाने कृतज्ञता व आदरभाव ठेवणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे संचालन प्रा अक्षय माळी यांनी केले.
यावेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.