(राजापूर)
तालुक्यातील परटवली, कुंभारवाडी येथे एका वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी घडली. सुनिता नारायण पेंडखळकर (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनिता पेंडखळकर या कोणालाही न सांगता आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील पडवीत गेल्या. सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ राजापूर पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
सुनिता पेंडखळकर यांनी आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीय व परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.