(रत्नागिरी)
रत्नागिरी नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी व जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी तुषार बाबर यांना पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांची नवीन ठिकाणी बदली करण्यात आली आहे. मात्र, ते नेमके कुठे कार्यभार स्वीकारणार आहेत, याची अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.
तुषार बाबर यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी लांजा व राजापूर नगरपरिषदांमध्येही मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. जिल्ह्याचे प्रमुख शहर असलेल्या रत्नागिरीत प्रभारी मुख्याधिकारी म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाची विकासकामे यशस्वीरित्या मार्गी लावली.
बाबर यांच्या बदलीनंतर रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.