(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन खाडीत करजुवे, धामापूर, कासे आदी ठिकाणी वाळू उखन्नास शासन बंदी असताना तसेच अवैद्य वाळू उपसा केला जात असेल तर त्यावर आणि तेथील सबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश असतानासुद्धा या शासन आदेशाला पायदळी तुडवत सक्शन पंप लावून रात्रंदिवस चक्क अवैध वाळू उपसा केला जात आहे. राजरोसपणे रात्रंदिवस चाललेला हा सारा खेळ सर्वसामान्य जनतेला दिसून येत आहे व कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने परिसर दणाणून जात असताना या बाबत महसूल विभागाने कानावर हात ठेवले आहेत, त्यांना दिसूनही येत नाही आणि आवाजही येत नाही हे आश्चर्य म्हणण्यापेक्षा अर्थपूर्ण संगनमताने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप मुळेच सर्वकाही बिनदिक्कत चालले असल्याची परिसरात संतप्त चर्चा परिसरात सुरू आहे. यावर जिल्हाधिकारी कारवाईचा बडगा उचलणार का याकडे स्थानिक जनतेचे लक्ष लागले आहे.
करजुवे -माखजन या खाडीत अमाप अशी नैसर्गिक देणगी निसर्गाने दिली असून, या ठिकाणी असलेल्या वाळूवर शासनाचा अधिकार असताना यावर धंनदाडगे वाळू चोरांची नजत पडली असून शासन बंदीला धुडकाऊन राजरोसपणे सक्शन पंपाचा वापर करून एका दिवसात हजारो ब्रास वाळू उपसा केली जाते. तसेच त्याची वाहतूक खुलेआम केली जात आहे. मात्र सबंधित स्थानिक तसेच तालुका प्रशासन एवढं सर्व राजरोस डोळ्यादेखत सुरु असलेल्या प्रकाराकडे डोळेझाक करण्याचेच आद्यकर्तव्य समजत होते.
वाळू उपसा बंदीला फाटा देण्याच्या कारभाराला वाळू चोर आणि आणि सबंधित विभागाचे अर्थपूर्ण सबंध असल्यामुळेच की काय?प्रसार माध्यमातून बातम्या आल्यावर किरकोळ कारवाईचा बडगा उचलला जातो, मात्र प्रशासन यंत्रनेणे पाठ फिरवताच पुन्हा काही वेळातच वाळू उपसा करण्याचे काम चालू यावरून असे समजते की जनतेला दाखवण्यासाठी नुसता कारवाईचा फार्स केला जातो.
काही दिवसांपूर्वी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांनी वाळू उपसा बंदी असताना रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडून थेट कारवाई केल्याने वाळू उपसा करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. स्थानिक तसेच तालुका महसूल यंत्रनेची भीती नसलेल्यांच्या मनात पोलिसी दहशतच एकप्रकारे निर्माण झाली होती की काय? गेले काही दिवस वाळू उपसा तसेच वाळू वाहतुकीला ब्रेक लागला होता. मात्र चार दिवसांपूर्वी शिवप्रसाद पारवे रजेवर गेल्याचे समजताच वाळू उपसा करणाऱ्यांकडून करजुवे, माखजन खाडीत पुन्हा तेवढ्याच जोमाने वाळू उपसा केला जात असून शेकडो गाड्या भरून माखजन आरवली मार्गे तसेच डिंगणी -शास्त्रीपुल मार्गे भरून जात आहेत. हे जनतेला दिसून येत असताना स्थानिक व तालुका महसूल प्रशासनाला न दिसून येणे म्हणजे लाखो करोडो चा उत्पन्न बुडवून वाळू उपसा करणारे व सबंधित विभागाचे अर्थपूर्ण सबंध असल्यामुळेच सर्वकाही खुलेआम सुरु आहे काय, अशी शंका आता स्थानिक जनतेच्या मनात येऊ लागली आहे.