(दापोली)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती- कोकण विभागाचे वतीने दापोली येथील सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृह येथे विजय कोंबे, राज्याध्यक्ष शिक्षक समिती यांचे अध्यक्षतेत कोकण विभाग यांचा भव्य मेळावा व शिक्षण परिषद दि.१३ एप्रील रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी समिती जिथे जिथे बोलावते, तिथे तिथे आपण हजर असतो. प्राथमिक शिक्षण हा पाया असून मुलांच्या सर्वांगिण विकासात अडथळे निर्माण करणारी अशैणिक कामे लादू नयेत या मताचा आपण असल्याचे सांगितले.
तसेच संचमान्यता असो वा सर्व मागण्या टप्याटप्याने पूर्ण करण्यास आपण कटिबध्द असून, आपण जि.प.शाळेत शिकलोय याचा अभिमान असल्याचे आणि जुनी पेन्शन महायुतीचंच सरकार देऊ शकतं. यासाठी सर्व प्राथमिक शिक्षकांनी एकत्र आले पाहिजे. प्राथ.शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व असून,जे जे आश्वासन देऊ ते ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु असा शब्द पालकमंत्री सामंत यांनी दिला. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांचेसोबत एक बैठक घेऊन मागण्यांना न्याय देण्याचं काम टप्प्या टप्प्याने पूर्ण केले जाईल अशी सामंत यांनी शासनामार्फत ग्वाही दिली.
तर राज्यमंत्री योगेश कदम, यांनीही शासकीय कर्मचारी अनिच्छेने कधीच काम करीत नसतात,शिक्षकांची इच्छा असुनही अशैक्षणिक कामांमुळे त्यांच्या मुलभूत कामात अडथळे येत असतात, शासन आणि प्रशासन एकत्र येऊन तणाव मुक्त काम केल्यास सुशासन राहील असे सांगत, कोणतीही शाळा बंद होणे ही काय शोभनीय बाब नाही. कोणतीही शाळा बंद पडणार नाही, तसेच आपल्या कोकण विभागासाठी डोंगरी निकष कसे लागू होतील यासाठी प्रयत्नशील राहू; आणि विविध मागण्यांसंदर्भात राज्य शिक्षक समितीच्या भुमिकेशी मी सहमत असून, शिक्षकांनी शाळेच्या गावात २४ तास उपस्थित असणं अपेक्षित नसून, शालेय कामकाजासाठी वेळेत उपस्थित असणे गरजेचे आहे. आपण दोन दिवसात आपल्या प्रश्नांसंदर्भात मंत्रिमहोदयांसोबत बैठक घेऊ असे आश्वासन दिले. तीन प्रमुख मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांचेसोबत बैठकीत तोडगा काढला जाईल असे मंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही आपण शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. उदय शिंदे शिक्षक नेते, राज्य सर चिटणीस राजन कोरगावकर, विजयकुमार पंडित, राज्य सल्लागार यांनी मंत्री महोदयांकडे विविध मागण्या मांडल्या. प्रारंभी स्वागताध्यक्ष तथा कोकण विभाग अध्यक्ष अंकुश गोफणे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.यानंतर जिल्हानिहाय संघटनात्मक आढावा,शिक्षक विद्यार्थी समस्यांबाबत चर्चा करणेत आली.तसेच संघटनात्मक व प्रशासकिय कामांविषयी विविध मान्ययवरांनी मार्गदर्शन केले.
सदर मेळावा उत्तम प्रकारे पार पडावा यासाठी दिपक शिंदे जिल्हा अध्यक्ष, दिलीप महाडिक जिल्हा नेते, संतोष पावणे जिल्हा सचिव, सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी दिलीप मोहिते, शरद भोसले,सुनील दळवी, स्वप्नील परकाळे, नरेंद्र उकसकर, विजय क्षिरसागर, विठ्ठल कुठेकर, विश्र्वास भोपे, शशिकांत शेळके, अनिलकुमार मळगे, संजय माने, अरुण सोनवणे, गुलाब आहिरे, भरत शिद आदिंनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन संतोष पावणे यांनी तर आभार रुपेश जाधव यांनी केले.