रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोंडे नारशिंगे व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे तपासणी ते उपचार आरोग्य योजनेमार्फत बांधकाम कामगारांचे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
बांधकाम कामगारांचे आरोग्य चांगल्या पद्धतीने रहावे यासाठी सदर आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सर्व कामगारांची योग्य तपासणी केली गेली व सर्व तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना योग्य उपचार देखील करण्यात येणार असल्याचे या शिबिरातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची देखील तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी ग्रुप ग्रामपंचायत बोंडे नारशिंगे चे सरपंच गणेश कांबळे, उप सरपंच महेश देसाई, सदस्य मनोहर पानगले, शुभांगी कांबळे, अस्मिता शितप, शिवसेना विभाग संघटक मिलिंद खानविलकर, शिवसेना महिला उप विभाग प्रमुख मैथिली देसाई, तसेच बांधकाम कामगार कार्यालयातील स्वयंम सुर्वे, शुभम सुर्वे, आदित्य ठीक, दीपाली पेडामकर, योया चव्हाण, विपुल चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय इरमल, तलाठी पूनम साळवी, आरोग्य उपकेंद्र बोंड्ये चे cho सूर्यवंशी मॅडम, आरोग्यसेवक संजय कळंबटे, प्रियांका रावणंग, आशासेविका स्वाती इंदुलकर, crp प्रियांका पानगले, समिक्षा पानगले, ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर समीर गोताड, ग्रा. पं. शिपाई रसिका कुळये प्रशिक्षणार्थी प्रफुल्ल कांबळे तसेच १५० पेक्षा जास्त बांधकाम कामगार बंधू भगिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबीर उपक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत बोंडे नारशिंगेचे उपसरपंच महेश देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.