(देवरूख / प्रतिनिधी)
वाघजाई ग्रामदेवता पालखी उत्सवाचे औचित्य साधून तेर्ये (बुरंबी) गावांमधील एक सेवाव्रती बुजुर्ग महिला श्रीम. प्रमिला श्रीकांत म्हैसकर (वय ८७) यांचा शाल श्रीफळ आणि ग्रामदेवतेची प्रतिमा देऊन हृदय सत्कार तेर्ये गावातील ग्रामदेवतेचे ट्रस्टी प्रकाश दळवी यांच्या हस्ते करण्यात आला.
म्हैसकर ताईं गेली पन्नास वर्षे सातत्याने सेवा म्हणून दशक्रोशीमधील, तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधील लोकांना कावीळवरील आयुर्वेदिक औषध अव्याहतपणे देत आहेत. या औषधाने अनेक माणसं बरी झाली आहेत.
कुटुंबासोबत समाजात राहताना सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाचं देणं लागतो. ही तळमळ ठेवून सर्व जातीधर्माच्या लोकांना ताईंनी हे औषध देणं वयाच्या ८७ व्या वर्षी सुध्दा चालू ठेवल आहे. त्या खलबत्त्यामध्ये कुटून औषध देतात. त्यांचा तेर्ये भूषण म्हणून हा सत्कार करण्यात आला.
आजपर्यंत काविळीच्या हजारो रुग्णांना या औषधाचा गुण आला आहे.