(मुंबई)
परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा ४५१ पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे.
गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागितले आहे. “परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली” असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे.
सोमनाथ यांचा १५ डिसेंबर रोजी कोठडीत असताना मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण तापलेले आहे. तर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीतच हा मृत्यू झाला आहे. त्या संदर्भात सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमाही होत्या, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आलेय. मात्र राज्य सरकारने अद्याप एकाही पोलीस अधिका-यावर कारवाई केलेली नाही. परिणामी आम्हाला सरकारची मदत नको, पण दोषींवर कारवाई हवी आहे, अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे. तर दोषी पोलीसांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबिय सातत्याने करत आहेत.
न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशीना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. एका माथेफिरूने १० डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती, त्यानंतर स्थानिकांनी संतप्त आंदोलन केले. या आंदोलनात जाळपोळ झाली. आंदोलनानंतर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. सूर्यवंशी यांचा तुरुंगात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित संताप व्यक्त करण्यात येत होता.
सोमनाथ सूर्यवंशींना अटक केल्यानंतर १४ डिसेंबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर १५ डिसेंबरच्या पहाटे जिल्हा कारागृहात सोमनाथ यांना छातीत जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सकाळी सातच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती तुरुंग प्रशासनाने दिली होती. मात्र, सू्र्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केले. पोलिसांनी तुरुंगात छळ केल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबाने केला होता.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे. परभणीच्या नवामोंढ पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागितले आहे. “परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवामोंढ पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली” असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा ४५१ पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे.