(रत्नागिरी)
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त रत्नागिरी च्या
बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या सहकार्यातून दशावतार विद्यार्थ्यांसाठी रंगभूषा वेशभूषा आणि कला सादरीकरण यांचे आयोजन झाले सिद्धेश कलिंगण प्रस्तुत
कल्लेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यातील आणि गोव्यामध्ये अतिशय श्रद्धेने आणि व्यावसायिक पद्धतीने दशावतार नाट्य मंडळ आपली कला सादर करत असतात आणि फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत असतात आज वेशभूषा आणि रंगभूषा असा वेगळा व्यक्ती न ठेवता तो कलाकारस सर्व करत असतो हे प्रशिक्षण पाहायला मिळाले स्त्रीपात्र विरहित काम करत असताना सर्व कामे नियोजन पद्धतीने चाललेले असतात सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये सातत्याने त्याचे प्रयोग सुरू असतात हे सातत्य असण्याचे कारण म्हणजे त्यांची मॅनेजमेंट आणि कले संदर्भामध्ये असलेली अध्यात्मिक जोड या दोन गोष्टींमुळे दशावतार हा कलेचा प्रकार सातत्याने सुरू आहे आणि श्रद्धेने सुरू आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये नाट्य नृत्य संगीत त्याचबरोबर कल्चरल हेरिटेज अशा विविध अभ्यासक्रमामध्ये लोककलेचा अंतर्भाव आहे मेजर आणि मायनर डिग्री मध्ये पहिल्याच वर्षी 45 विद्यार्थी नी प्रवेश घेतला आहे त्यांना दर्जेदार कार्यक्रम दाखवणे आणि सादरीकरण करून घेणे हा त्यातील महत्त्वाचा भाग. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून श्री नंदकिशोर जुवेकर व डॉ.आनंद आंबेकर बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विभाग प्रमुख यांच्या समन्वयाने आणि पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या प्रयत्नामुळे दशावतार याचे प्रशिक्षण 17 ते 25 मार्च पर्यंत सुरू आहे या दर्जेदार प्रशिक्षणाला इतर मान्यवरांचे सुद्धा सहकार्य राबत आहे
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे सहकार्यवाह प्रा.श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, उपप्राचार्य डॉ.सीमा कदम, समन्वयक डॉ.मीनल खांडके, विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर, प्रा. वेदांग सौंदलगेकर, प्रा.हरेश केळकर, प्रा.कश्मिरा सावंत आणि बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे विद्यार्थी उपस्थित होते.