(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील विल्ये गावचे सुपुत्र, सध्या मुंबई विरार येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध कवी अमित जयवंत कांबळे यांना शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट लेखन साहित्याबद्ल व वृत्तपत्रीय भरीव लेखनाबद्दल त्यांना २०२५ या वर्षीचा कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई तर्फे पूज्य साने गुरुजी समाजभूषण राष्ट्रस्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
सदर पुरस्काराचे वितरण ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. कामोठे, नवी मुंबई येथे होणार आहे. कवी अमितकुमार कांबळे हे चिंतनशील लेखक, कवी व साहित्यिक म्हणून ते परिचित असून त्यांनी आजपर्यंत विविध ज्वलंत विषयांवर प्रबोधनपर लेखन केले आहे. शैक्षणिक- सामाजिक- राजकीय -कला -क्रीडा या क्षेत्रातील अनेक विषयांवर त्यांचे परिवर्तनशील लेखन विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. ते स्वतः लेखक असून कवी म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.
एखाद्याचे मन हा त्यांनी स्वतः नाट्यप्रयोग लिहिला आहे. २००३ पासून कोंकण व मुंबई विभागातील मोठमोठ्या दैनिकांतून त्यांचे लेखन साहित्य प्रकाशित झाले आहे. अमित कांबळे यांना अलिकडेच लेखन साहित्य व वृत्तपत्रीय भरीव कामगिरीबद्दल त्यांना कोंकणदीप साहित्य रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यावर्षी पुज्य साने गुरुजी समाज भूषण राष्ट्रस्तर पुरस्कार जाहीर झाल्याने कवी लेखक अमितकुमार कांबळे यांचे मुंबईसह रत्नागिरी-साहित्य क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

