(रत्नागिरी)
धावत्या मालवाहतुक रेल्वेखाली उडी घेत तरुणाने अज्ञात कारणातून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 15 मार्च रोजी रात्री 7.44 वा. सुमारास घडली.
बसूराज शरणप्पा कुडगी (38, रा. एमआयडीसी रेल्वे कॉलनी, शेजारी रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बसूराजने शनिवारी रात्री 7.44 वा. सुमारास अज्ञात कारणातून निवसर ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन येणाऱ्या मालवाहतुक रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.