(साखरपा / भरत माने)
रत्नागिरी कोल्हापूर मार्गांवर आरटीओ विभागाकाकडून सर्वसामान्य स्थानिक वाहतूकधारकांना त्रास देण्याचे सत्र सुरु झाले आहे. याउलट मात्र या मार्गांवर वाहतुक होत असणाऱ्या परप्रांतीय वाहतूकधारकांना मात्र कोणतीही कारवाई न करता सोडण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या महागाईमुळे आधीच जनता त्रस्त आहे, त्यातच स्थानिक वाहतूकदार प्रामुख्याने ट्रक, डंपंर, ट्रॅव्हलस, रिक्षा व्यवसायिक यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. या प्रकारामुळे माजी सभापती जया माने यांनी आक्रमक होत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महामार्गावर मोठया प्रमाणावर बेकायदेशीरपणे चिरा, वाळू, जयगड बंदरवरील सामनाची ओव्हरलोड वाहतूक होत असते, त्यावर कारवाई न करता त्यांना देवाणघेवाण करून सोडून देण्यात येते. मात्र सर्वसामान्य वाहतूकदाराना दंड करण्यात येतो, यामुळे स्थानिक वाहतूकदारांमध्ये संतापाची लाट आहे. यामुळे स्थानिक व्यवसायिक त्रस्त झाले आहेत. जर हे प्रकार थांबले नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा संगमेश्वर तालुका माजी सभापती जया माने यांनी दिला आहे.