(गुहागर / रामदास गमरे)
न्यू इलेव्हन झोंबडी क्रिकेट क्लब आयोजित एकदिवसीय एकग्रामपंचायत क्रिकेट स्पर्धेमध्ये “मुंढर वाघजाई संघ, मुंढर गाव” या क्रिकेट संघाने प्रथम क्रमांकावर तसेच “आर. के एन. चिखली बौद्धवाडी” या संघाने द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरल्याने मुंढर व चिखली ग्रामस्थांमध्ये हर्षोउल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर क्रिकेट स्पर्धेमध्ये आर. के. एन. चिखली बौद्धवाडी संघाचा दिनेश कदम याने उत्कृष्ट फलंदाज तर मुंढर वाघजाई संघाच्या करण अंबाला उर्फ करण गोनबरे याने उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. सदर सामन्यांत वाघजाई मूंढर टीममधील पोलिस पाटील, किरण धनावडे, सागर सुर्वे, राजेश मोहिते, करण गोनबरे सिद्धेश मोहित, नरेश जोगळे, आदित्य शिर्के, ऋषभ शिर्के, पारस शिर्के, स्वप्निल आग्रे, संजय आदावडे, बंड्या रामाने, वेदांत गावडे, आर्यन कांबळे, पंकज कांबळे या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
अटीतटीच्या सामन्यांत मुंढर वाघजाई क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक व आर. के. एन चिखली बौद्धवाडी संघांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..