(दापोली)
दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार व राज्याचे गृहमंत्री नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दापोली येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दापोली तालुका मराठी पत्रकार परिषद, कोकण एसटी प्रेमी व दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.ममता शिंदे यांच्या पुढाकाराने गेली अनेक महिने बंद असलेली फरारे मोगरेवाडी-उन्हवरे मुंबई ही बस सेवा दापोली आगराच्या वतीने सुरू करण्यात आली.
यावेळी सौ.ममता शिंदे यांनी बत्तीस गावांमध्ये ही बस अत्यंत उपयोगी असून, दापोली आगारातील प्रतिष्ठेची अशी ही सेवा गेली अनेक वर्ष ओळखली जाते. मात्र कोरोनानंतर ही बस सेवा अनियमित झाली असून आता राज्यमंत्री रामदास योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली असल्याचे सांगितले. दापोली आगाराने ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवून परिसरातील जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा यावेळी सौ.ममता शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी सभापती किशोर देसाई माजी समाजकल्याण सभापती सौ.चारुता कामतेकर, कोकण एसटी प्रेमी राज्य उपाध्यक्ष श्री.विकास गुरव, सचिव शैलेंद्र केळकर,उन्हवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री मुराद चिकटे, माजी उपसरपंच श्री.मंगेश शिंदे, वावघर पोलीस पाटील सौ.गौसिया चिकटे सौ. मीनाज महाते, तनवीर चिकटे, आगार प्रमुख श्री.उबाळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्री.मुनाफ राजापकर, वाहतूक नियंत्रक श्री.हर्षल नाफडे, दापोली आगाराचे चालक वाहक तसेच पत्रकार श्री.प्रशांत कांबळे, श्री.राजेश लिंगायत, श्री.सलीम रखांगे व प्रवासी उपस्थित होते.