(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील ओरी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत अंतर्गत घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये केंद्र शाळा ओरी नं .१ शाळेतील शिवम संकेत देसाई आणि स्पृहा संकेत देसाई या दोन विद्यार्थ्यांनी लहान गटातून प्रथम क्रमांकांची पारितोषिके पटकावून विजय संपादन केला आहे.स्पृहा संकेत देसाई इ.५ वी मुलींमध्ये सर्वप्रथम तर शिवम संकेत देसाई,इ.३ री मुलांमध्ये सर्वप्रथम आला आहे.
या यशाबद्दल या दोन्ही विजेत्या स्पर्धकांचे शाळेचे मुख्याध्यापक धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक गणपती पडूळे, रामदास चव्हाण, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष वसंत जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत देसाई यांनी खास कौतुक करून बीट स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

