(रत्नागिरी)
‘अंत्योदय प्रतिष्ठान’ व ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’च्या माध्यमातून रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४ डायलिसिस मशिनचा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक २ फेब्रुवारी रोजी राज्याचे मंत्री श्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. मागच्या DPDC बैठकीत याठिकाणी डायलिसीस मशीन मागवण्यात आल्या होत्या. कोकणचे सुपुत्र प्रसाद लाड व पत्नी सौ. नीता लाड यांनी अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठानच्या माध्यमातून या डायलिसीस मशीन देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणचे ज्येष्ठ नेते नारायण राणे, मंत्री श्री हसन मुश्रीफ, खासदार श्री सुनील तटकरे, मंत्री श्री योगेश कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.हसन मुश्रीफ, खासदार श्री सुनील तटकरे, मंत्री श्री योगेश कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.