(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व तायक्वांदो मार्शल स्पोर्ट सेंटर मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीपुळे येथे तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव 5th डान ब्लॅकबेल्ट लक्ष्मण कररा यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडली या वेळी चिन्मयी गोनबरे, स्वरीत डांगे, यूविका गुरव, वेदांत बापट हे ब्लॅक बेल्टधारक उपस्थित होते. या परीक्षेत तायक्वाडो मार्शल आर्ट स्पोर्ट सेंटर मालगुंड च्या खेळाडूनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत सुयश संपादन केले.
यश संपादन केलेले खेळाडू येलो बेल्ट_दुर्वांक लिंगायत, ऋतुजा रामानी अस्मी झोरे, व्यंकटेश धोत्रे, पल्लवी धोत्रे, ग्रीन बेल्ट_सोहम यादव, ग्रीन वन_दिव्या भोसले, खुशी वारेकर लावण्या वारेकर, श्रेयस भिडे, रेड बेल्ट_ऋतुराज सुर्वे, श्रावणी रानडे, आर्या रानडे, रिया माईन, रेड वन_स्मित दुर्गवळी, चिन्मयी दुर्गवळी, स्वरा डांगे, शर्वरी धुरी या खेळाडूंना प्रशिक्षक रुपेश तावडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल क्लबचे रोहित मयेकर, राज देवरुखकर, किशोर गुरव, सुरज पवार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, राम कररा मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर आदींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.