(संगमेश्वर / एजाज पटेल)
शास्त्रीपुल -डिंगणी मुख्य रस्त्यावर कोंड असुर्डे येथे शास्त्रीपुलच्या दिशेने जाणारी रिक्षा व डिंगणी च्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट या चारचाकी वाहनाचा अपघात होऊन रिक्षा चालक व रिक्षातील अन्य एक महिला प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी 11.30 च्या सुमारास झाला. MH 12QF 9642 या क्रमांकची स्विफ्ट चारचाकी वाहन घेऊन चालक अमित रमेश शेट्ये हे पुणे येथून गणपतीपुळे येथे जात होते. तर सूरज रमेश मोरे (राहणार -संगमेश्वर ओझरखोल)हा आपल्या ताब्यातील नवीन रिक्षा असल्याने त्यावर नंबर नसलेली रिक्षा घेऊन डिंगणी येथील सी. एन. जी पंपावर गॅस भरण्यासाठी गेला होता. तो रिक्षात गॅस भरून पुन्हा ओझरखोल येथे परतीच्या मार्गांवर जात असताना कोंडअसुर्डे येथे या दोन्ही वाहनांचा अपघात झाला.
या अपघातात रिक्षा मुख्य रस्त्याच्या बाहेर जाऊन पलटी झाली. तर स्विफ्ट चारचाकी वाहनाचा पुढील टायर फुटून दर्शनी बाजूचे नुकसाम झाले आहे. तसेच रिक्षा पलटी होऊन रिक्षाचे नुकसान झाले आहे. स्विफ्ट चारचाकी वाहनातून चालक आणि अन्य तिन प्रवाशी तर रिक्षा मधून चालक आणि अन्य एक महिला प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात रिक्षा चालक सूरज हा किरकोळ जखमी झाला असून रिक्षातून प्रवास करणारी महिला नाव समजले नाही, ती सुद्धा किरकोळ जखमी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच डिंगणी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्सटेबल पंदेरे, पोलीस कॉन्स्टेबल म्हस्कर,संगमेश्वर चे पोलीस हेड कॉन्स्टबेटल सचिन कामेरकर, पोलीस हेड कॉन्सटेबल विनय मनवळ यांनी अपघातस्थळी येऊन रखडलेली वाहनवर्दळ सुरळीत करून अपघाताचा पंचनामा केला.