(राजापूर / राजन लाड)
राजापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर येथे आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले जाधव नियत वयोमानानुसार 31 ऑक्टोंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
1993 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे तालुका खेड येथून आरोग्य सेवक म्हणून त्यांनी आपल्या आरोग्य सेवेतील कामाला सुरुवात केली. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कडवई ता. संगमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी ता. येथे आरोग्य सेवक म्हणून सेवा बजावल्यानंतर 7 जून 2011 मध्ये पदोन्नतीने आरोग्य निरीक्षक पदावर बढती मिळाल्यावर जैतापूर आरोग्य केंद्र येथे रुजू झाले.
आपल्या वैद्यकीय सेवेतील कारकिर्दीत शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिकपणे सेवा बजावली. 31 ऑक्टोबर 2024 रोजी ते सेवानिवृत्त झाले असून जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सर्वेश रुमडे, डॉ. विकास राठोड यांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तसेच मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.