(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक कास्ट्राईब शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची महत्त्वपूर्ण सभा रविवार दिनांक – ६ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रत्नागिरी जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिरीष भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वप्नपूर्ती हॉटेल खंडाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या प्रारंभी थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली.
या सभेदरम्यान नवनिर्वाचित मुख्याध्यापक शिवाजी जगताप, वरवडे शाळा तसेच मुख्याध्यापक केरबा कांबळे, मु .लांजा यांचा तालुका संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक दिपक गमरे व मुख्याध्यापक अमोल सरनोबत यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सदस्य सभासद यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
जिल्हा कास्ट्राईब संघटनेचे सहसचिव सुवेश चव्हाण यांनी संघटनेची गरज व महत्त्व याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर येथील तालुका पदाधिकारी अमोल सरनोबत, संतोष कांबळे, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश कांबळे तसेच उपाध्यक्ष विनोद सांगावकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संघटनेचे कायदेशीर सल्लागार केशवराव गायकवाड यांनी संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा? याविषयी माहिती दिली.
या सभेत नंदादीप जाधव, संतोष चव्हाण, संचिता जाधव, संतोष कांबळे यांनी पदोन्नती संदर्भात आपल्या समस्या संघटना पदाधिकारी यांच्यासमोर मांडल्या. यावेळी ज्यांच्या समस्या आहेत त्यांनी तालुकाध्यक्षांकडे लेखी अर्ज करावेत असे सांगण्यात आले. संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी सुधाकर कांबळे यांनी मांडले, तर संघटनेनं ज्यांची कामे केली आहेत त्यांनी संघटनेत सक्रिय व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष शिरीषजी भालशंकर यांनी केले.
या सभेसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त सरचिटणीस तथा कास्ट्राईब कर्मचारी महासंघ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुधाकर कांबळे , रत्नागिरी जिल्हा काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिरीषजी भालशंकर, कायदेशीर सल्लागार केशवराव गायकवाड,जिल्हा कास्ट्राईब संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश कांबळे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष एस्. के. जाधव, जिल्हा उपाध्यक्ष विनोद सांगावकर, जिल्हा सहसचिव सुवेश चव्हाण, मुख्याध्यापक शिवाजी जगताप, केरबा कांबळे, दिपक गमरे, अमोल सरनोबत, संतोष कांबळे तसेच संचिता जाधव, तालुका सहसचिव संतोष वाजे, नंदादीप जाधव, ईश्वर मगर,सुहास कुंभार, कुणाल तडवी, संतोष चव्हाण उपस्थित होते.
या संपूर्ण सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष एस्. के. जाधव यांनी उत्तमरित्या केले. सभा यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.