(रत्नागिरी)
कापडगांव कार्यक्षेत्रामध्ये गणेश उत्सवानिमित्त महिला मुक्तांगण कार्यक्रम संपन्न झाला. गणेश उत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा व्हावा व कोकणची लोककला जागृत रहावी, समाजात दारूबंदी, पर्यावरण रक्षण, नैसर्गिक हानी, महिलांवरील अत्याचार, बेटी बचाव बेटी पढाव व इतर जनजागृती करणारी गाणी व नृत्य सादर करण्यात आले.
या कार्यक्रमांसाठी प्रशिक्षक म्हणून लाभलेले श्री. तारवे, श्री. बोंबले, श्री. घवाळी आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उज्वला मांडवकर, श्री.विलास मांडवकर, अभिजीत मांडवकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमा मध्ये सात नृत्य पथकांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी प्रथम क्रमांक श्री साई नृत्य महिला मंडळ, द्वितीय क्रमांक पावणाई कुरतडकर वाडी, तृतीय क्रमांक श्रीराम महिला मंडळ बाराकोत्रेवाडी या सर्वांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.