( संगमेश्वर / प्रतिनिधी )
प्रशासनाने गॅसधारकांस OTP शिवाय सिलेंडर देऊ नये असा फतवा काढल्याने ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी अडचणीत आल्या होत्या, संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण भागात मोबाईल रेंज मिळत नसल्याने ही अट शिथिल करावी अशी मागणी होत असल्याने तालुक्याचे जेष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांनी आवाज उठवला होता.
दरम्यान ग्राहकांना मिळणारा सिलेंडर कमी वजनाचा मिळत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्यामुळे पत्रकार विचारे यांनी आपला स्वतःचा आलेला सिलेंडर उचलून पाहिला तो सिलेंडर हलका लागल्याने वजन करून मागितला. मात्र वितरकाने विचारे यांना सिलेंडर न देता त्याने थेट विचारे यांची नोंदणीच रद्द केली होती.
या सर्व प्रकारlची रीतसर लेखी तक्रार सत्यवान विचारे यांनी मा, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी, मा,तहसीलदार कार्यालय देवरुख यांच्याकडे करून त्याच्या प्रति मा, पालक मंत्री श्री, उदयजी सामंत, मा,आमदार शेखरजी निकम यांना पाठवल्या होत्या. यासोबतच कोंड उमरे येथील स्थानिक ग्रामस्थ तथा विधानभवनचे मार्शल गार्ड श्री प्रवीण जाधव यांना एक प्रत पाठवली असता प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्री, प्रवीण जाधव यांनी श्रीमती निलमताई गोरे यांना मा,उप सभापती विधीमंडळ सचिवालय यांचे ओ. एस. डी. श्री. रणखांबे यांना तक्रारीची प्रत दिली. तसेच या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली होती.
मा. नीलम ताईगोरे यांचे OSD श्री. रणखांबे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून संबधित विषयाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचा अहवाल तात्काळ पाठवावा अशा सूचना केल्या आहेत. सचिवालयाकडून सूचना प्राप्त होताच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देवरूख तहसिलदार कार्यालय येथील नायब तहसीलदार कार्यालयातील मा. नायब तहसीलदार (देवरुख तहसीलदार रजेवर असल्याने ) श्री. पंडीत यांच्याशी संपर्क करून सदर विषयात जातीने लक्ष द्यावे असे सांगितले आहे. याचे हा अत्यंत गंभीर विषय असून तुम्ही स्वता लक्ष घालावे व आम्हाला कळवावे अशा सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
ओटीपी शिवाय सिलेंडर द्यावेत
विधिमंडळ सचिवालयाचे ओ एस डी श्री, रणखांबे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घातल्याने आता ग्रामीण भागातील जनतेला ओटीपी शिवाय सिलेंडर द्यावेत, सिलेंडर देताना तो वजन करूनच द्यावा, गॅस गाडीसोबत येणारे डिलिव्हरी बॉय हे गणवेशात असले पाहिजे, प्रत्येक गाडीत वजन काटा असणे आवश्यक आहे. त्या सिलेंडरवरील कालबाह्यता तारीख तपासून ग्राहकाला सिलेंडर देण्यात यावा अशा सक्त सुचना सचिवालयाकडून देण्यात आल्या आहेत. आता गॅस वितरक नियमांचे पालन करतात की पुन्हा आपला मनमानी कारभार सुरू ठेवतात,हेच पाहावे लागणार आहे.