(तरवळ/ अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा रत्नागिरी यांच्या वतीने, ग्राम शाखा शिरगाव येथील प्रज्ञा बुद्ध विहार येथे रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात तालुका व गाव शाखा पदाधिकारी व धम्म बांधव यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते आदर्श तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले व संपूर्ण सुत्रपठण घेण्यात आले.
ग्राम शाखेच्या वतीने तालुका शाखेचे पदाधिकारी व मान्यवर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तालुका अध्यक्ष आयु. विजय मोहिते व संस्कार विभाग प्रमुख आयु. संजय कांबळे, यांनी या वर्षावास कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
वर्षावास मालिकेतील १४वे पुष्प अनित्य, अनात्म व दुःख या विषयावर प्रवचनकार, श्रामणेर बौद्धाचार्य व पाली भाषेचे अभ्यासक आयु. नंदकुमार यादव, निवेंडी भगवतीनगर यांनी माहिती देताना सांगितले की, तथागतांचा धम्म आपल्याला कसा प्रेरणादायी आहे, तथागतांनी आत्मा अस्तित्वात नाही हे आपल्याला सांगितले आहे, दुःख सर्वांना आहे, पाचही उपादान स्कंध दुःखच आहेत. यांच्या आसक्तीमुळे लोभ व अहंकाराची भावना निर्माण होते, यांचा अतिरेक हेच दुःखाचे मूळ आहे. अनित्य आणि अनात्मवाद समजून घेऊनच दुःखाचा नाश करता येईल, त्यामुळे जीवन सुखमय होईल. त्याची कारणं शोधली तर त्यावर मात कशी करता करता येते याबाबत, अनित्य अनात्म व दुःख या विषयाचे अनुषंगाने सोप्या भाषेत आणि विस्तृतपणे विविध उदाहरणे देऊन अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं.
गाव शाखेचे सभासद आणि धम्माचा अभ्यास करणारे डॉ. स्वप्निल कांबळे यांनीही शुभेच्छा देताना मौलिक असं मार्गदर्शन केलं, आपल्या धम्मामध्ये ध्यानसाधनेला फार महत्त्व आहे, सकारात्मक विचार करून आपल्या शरीरातील उर्जा चांगली राहते, त्याबाबत प्रात्यक्षिकासह अनेक उदाहरणे देत, प्रत्येकाने आरोग्य चांगले राहण्यासाठी मेडिटेशन करावे, असंही सांगितलं. तालुका संस्कार विभाग सचिव आयु. गौतम सावंत यांनी गाव शाखेचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले. सदर वर्षावास कार्यक्रम गाव शाखेचे अध्यक्ष आयु. वैभव कांबळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गाव शाखा शिरगावचे सचिव, माजी तालुकाध्यक्ष आयु. रत्नदीप कांबळे यांनी केले .या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष विजय मोहिते, संस्कार विभाग प्रमुख संजय कांबळे, सचिव गौतम सावंत, आदेश कांबळे, संघटक नंदकुमार यादव, बौद्धाचार्य सुरेश जाधव, राजकुमार जाधव, माजी जिल्हा पदाधिकारी सत्यशिला पवार, तसेच ग्राम शाखा शिरगावचे पदाधिकारी अध्यक्ष वैभव कांबळे, सचिव रत्नदीप कांबळे, कोषाध्यक्ष अनिकेत जाधव, जेष्ठ सभासद प्रभाकर कांबळे, धम्माचे अभ्यासक डॉ. स्वप्निल कांबळे, ॲड. शिवराज जाधव बौध्दाचार्य सोहन कांबळे, बौध्दाचार्य मिलिंद कांबळे, महिला अध्यक्षा अनघा कांबळे, सचिव प्रिती कांबळे, कोषाध्यक्ष दिपा कांबळे, सहसचिव मयुरी कांबळे, सोनाली जाधव, जेष्ठ सभासद सुगंधा कांबळे, संपदा कांबळे, अनिता जाधव, आदी पुरूष व महिला पदाधिकारी, सदस्य व मोठ्या संख्येने शिरगाव शाखेतील धम्म बांधव उपस्थित होते.