(लांजा)
चारचाकी गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचे आमिष दाखवून बँक खात्याचा वापर करुन रत्नागिरीतील एका प्रौढाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लांजा पोलिस स्थानकात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूकप्रकरणी समीर युनूस राजपूरकर (४८, रा. रहेबर मोहल्ला, साखरतर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार इमाद अलताफ काझी (२९, रा. तळोजा, नवी मुंबई), इम्तीयाज अरशद खान (२१, रा. मुंब्रा, ठाणे), इब्राहिम नबी शेख, मुश्तफा इब्राहिम शेख (दोघेही रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
समीर राजपूरकर यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. चौघांनी त्यांना गाडी खरेदी विक्रीच्या व्यवसायाचे आमिष दाखविले. तसेच गाळ्यासाठी एक लाखाचा भाडे करार करायला सांगितला. तसेस नाशिक को ऑप. मर्कन्टाईल बँक शाखा वाशी व लांजातील एचडीएफसी बँकेत खाते काढून त्याचा परस्पर वापर केला. याप्रकरणी राजपूरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.