(कळझोंडी / किशोर पवार)
थिबाराजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट तालुका रत्नागिरी यांच्या वतीने सोमवार दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता थिबा राजाकालीन बुद्ध विहार (डीएसपी बंगल्या शेजारील) जागेत नूतन बुद्धविहाराचा भूमीपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे नियोजित भूमीपूजन महाराष्ट्र राज्याची उत्पादन शुल्क मंत्री नाम.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री नाम.उदय सामंत तसेच आदरणीय पूज्य भंते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न होणार आहे.
या भूमीपूजन कार्यक्रमाला रत्नागिरी तालुक्यातील गाव शाखेतून मोठ्या संख्येने बौद्ध धम्म बांधव भगिनी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमा स्थळी बंधू भगिनींना येण्या जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.गाववार आपल्या शाखेतून कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने बंधू-भगिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन थिबा राजाकालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट तालुका रत्नागिरी यांच्या वतीने ट्रस्टचे धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, सचिव विजय मोहिते, उपाध्यक्ष एम.बी.कांबळे, सुहास कांबळे, प्रितम आयरे, भगवान जाधव,शिवराज जाधव यांनी केले आहे.
सदर भूमीपूजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौध्दजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रत्नागिरी (आद. मीराताई आंबेडकर प्रणित), भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रत्नागिरी (आद. मोकळे प्रणित), पावस विभाग बौद्ध विकास संघ तसेच तालुक्यातील धम्म बंधू भगिनी अधिक मेहनत घेत आहेत.