(गावखडी / वार्ताहर)
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात अनंत चर्तुर्थी दिवशी गावखडी येथील श्रीगणेश भक्तांनी निरोप दिला.
कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे. एरवी भाविक मंदिरात जाऊन दर्शन घेतात, पण चतुर्थीला मात्र श्रीगणेशाची घरोघरी भाविक प्राणप्रतिष्ठापना करतात. मंगळवारी दहा दिवसांच्या गणरायाची ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक गावखडी येथे काढण्यात आली. काल पाऊस नसल्यामुळे गणेश विसर्जनाला अडचण आली नाह. गावखडी समुद्रकिनाऱ्यावर गणराया आम्हाला चांगले आरोग्य लाभो आम्हाला सुखी ठेव तसेच आमची भातशेती चांगली होऊ दे. दर्जेदार पीक आमच्या हाती मिळू दे, असे साकडे लाडक्या गणरायाला भक्तांनी घातले .