(दापोली / दिपक कारकर)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मांदिवली, तालुका दापोली या विद्यालयाने दापोली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत अनेक क्रमांक पटकावले. क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मांदिवलीच्या कुमारी दिया दीपक भुवड हिने 3000 मीटर धावणे आणि 400 मीटर हर्डल्समध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी आलिया सिद्दिक उमरोलकर हिने हातोडा फेकमध्ये, कुमारी अंतरा संदिप आग्रे हिने लांब उडीमध्ये आणि कुमारी जान्हवी रविंद्र हुमणे हिने उंच उडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
कुमार सोहम महेंद्र भुवड याने 1500 मीटर धावणे आणि 400 मीटर हर्डल्समध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कुमार आलोक सतिश खाडे याने 400 मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. कुमारी रिया दीपक भानशे हिने 3000 मीटर धावणे आणि 400 मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. कुमारी श्रेया निलेश शिगवण हिने हातोडा फेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.
कुमारी आक्शा संदिप आग्रे हिने 100 मीटर हर्डल्समध्ये द्वितीय, तर तिहेरी उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. कुमारी दक्षा संतोष हुमणे हिने उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक, कुमारी सलोनी श्रीधर भानशे हिने 1500 मीटर धावण्यात द्वितीय क्रमांक, तर कुमारी वृषाली रघुनाथ हुमणे हिने 600 मीटर धावणे आणि 80 मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. कुमारी प्रियसी प्रकाश बाईत हिने 80 मीटर हर्डल्समध्ये तृतीय क्रमांक, तर कुमार उत्कर्ष तुकाराम गोळे याने हातोडा फेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
सांघिक प्रकारात विद्यालयाच्या मुलींच्या 4 x 400 मीटर रिले संघाने द्वितीय, तर मुलांच्या 4 x 400 मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविणारे विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल स्कूल कमिटीच्या चेअरमन श्रीमती गीतांजली वेदपाठक, वीरसाई केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नागरगोजे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मंगेश कोकीळ, पालक श्री. तुषार भानशे, श्री. मनोहर जोशी, तसेच पालक आणि ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. सुनिल गुढेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व पालक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


