(गुहागर)
दि. २० व २१ डिसेंबर २०२४ रोजी पडवे केंद्राच्या क्रिडा स्पर्धा तवसाळ तांबडवाडी क्रिडा नगरीत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे यजमानपद ६ वर्षानंतर आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीला लाभले होते. याचे उत्तम नियोजन करण्यासाठी ग्रामस्थ, महिला मंडळ माजी विद्यार्थी व मुंबई मंडळ यांच्या सहकार्याने दोन दिवसीय स्पर्धेच्या आयोजनात पुढाकार घेतला. तर मुंबई मंडळाच्या वतीने तांबडवाडी ग्रामस्थ, महिला मंडळ यांच्या नावाचा चषक व मेडल्स आणि आर्थिक साहाय्य करत आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग आणि क्रिडा रसिक यांचेसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शालेय शिक्षण पालक कमिटी व ग्रामस्थ महिला मंडळ यांनी यासाठी उत्तम नियोजन केले होते.
यामध्ये एकुण १२ शाळा सहभागी झाल्या होत्या. सर्व शिक्षकांच्या वतीने ग्रामस्थ महिला मंडळ आणि मुंबई मंडळाचे विशेष अभिनंदन केले आहे. तर तांबडवाडी चॅम्पियन चषकाचे मानकरी ठरलेल्या कुंडली नंबर १ शाळेचे अभिनंदन करण्यात आले आणि काताळे शाळा नंबर १ बक्षीसाचे मानकरी ठरले. आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी- बाबरवाडी मुलांनी एकसंघ यावेळी ७ बक्षिसं मिळवली व वैयक्तिक मेडल्स मिळवत उत्तम कामगिरी केली.
केंद्रीय क्रीडा स्पर्धा उपस्थित मान्यवर पडवे ऊर्दू केंद्राचे अध्यक्ष श्री परवेज चिपळूणकर, काताळे- तवसाळ निर्मल ग्राम पंचायत सरपंच सौ. प्रियंका सुर्वे मॅडम, माजी सरपंच सौ नम्रता निवाते, शिक्षण प्रेमी श्री विजयजी मोहिते, भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष श्री निलेश सुर्वे, श्री विजय नाचरे, आदर्श शाळा कमेटी अध्यक्ष श्री रमेश कुरटे, उपाध्यक्ष सौ. वैष्णवी निवाते आणि सर्व सदस्य, काताळे गावचे सदस्य तवसाळ तांबडवाडी मधील वरिष्ठ ग्रामस्थ महिला मंडळ माजी विद्यार्थी, आणि सर्व शाळांमधील शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग तर आदर्श शाळेचे मुख्याध्यापक अंकुर मोहिते सर, साईनाथ पुजारा सर, संदिप भोये सर, बाबरवाडी शाळा ज्ञानेश्वर कोकाटे सर, अंगणवाडी सेविका श्रीमती संगीता सुर्वे मॅडम यांचे आभार मानण्यात आले.
क्रिडा स्पर्धा नियोजसाठी चंद्रकांत निवाते, मोहन घाणेकर, बारकु निवाते, रमेश कुरटे, कृष्णा वाघे, मंगेश पारदळे, दिनेश कुरटे, शिवराय घाणेकर, महादेव कुरटे, चंदू पवार, दिपक पारदळे, सोन्या कुरटे, शंकर वाघे, काशिनाथ कुळये, सखाराम वाघे, बबन कुरटे, आणि सर्व महिला मंडळ यांनी योगदान दिले. तर मुंबई वरुन स्पर्धेसाठी उपस्थित सचिन कुळये यांची प्रमुख उपस्थिती होती. संपुर्ण क्रिडा स्पर्धेचे फोटो, व्हिडिओ, फेसबुक live करुन YouTube वरही उपलब्ध आहे. तरी पडवे क्रेंद्राच्या वतीने तवसाळ तांबडवाडी व आदर्श शाळचे उत्कृष्ठ आयोजनासाठी सर्वांचे आभार मानले व मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.