(मुंबई / वृत्तसंस्था)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भातील सुधारित अधिसूचना प्रसिद्ध करत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. या सुधारित अधिसूचनेनुसार महसूल व वन विभागातील 1,539 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचा भरती प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे विविध विभागांतील अतिरिक्त 3,088 पदांची भर पडून एकूण पदसंख्या 5,707 वर पोहोचली आहे.
यासोबतच उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली असून, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली आहे. MPSC Group-C संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी OMR आधारित ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
तलाठी पदांसाठी पात्रता
तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. याशिवाय MSCIT प्रमाणपत्र तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असून, शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
या पदांचाही समावेश
सुधारित अधिसूचनेनुसार तलाठी पदांबरोबरच विविध विभागांतील अनेक पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल (11 पदे), सहायक अधीक्षक (11 पदे), सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (254 पदे), नियंत्रक शिधावाटप व नागरी पुरवठा कार्यालय (230 पदे), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (155 पदे), आदिवासी विकास विभाग (69 पदे), महसूल व वन विभागातील लिपिक-टंकलेखक (480 पदे) आणि नोंदणी व मुद्रांक विभागातील लिपिक-टंकलेखक (339 पदे) यांचा समावेश आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि त्यानंतरच्या पुढील निवड प्रक्रियेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाची असून सामान्य ज्ञान, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी, तर्कशक्ती आणि संगणक ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षा 200 गुणांची असेल.
अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी MPSC Online पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. नोंदणी करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी. त्यानंतर ऑनलाइन शुल्क भरून अर्ज अंतिम स्वरूपात सादर करावा.
अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग: ₹1,000
- राखीव प्रवर्ग: ₹900
- माजी सैनिक: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 31 जुलै 2026 (अधिकृत सुधारित अधिसूचनेतील अद्ययावत मुदत तपासावी)
- पूर्व परीक्षा: 25 ऑक्टोबर 2026
- परीक्षा पद्धत: ऑफलाइन (OMR आधारित)
परीक्षेची तारीख व अर्जाचे सुधारित वेळापत्रक
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline OMR आधारित) घेतली जाईल. वाढलेल्या पदांमुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे:
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: ०५ ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत).
ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: ०८ ऑगस्ट २०२६ (रात्री २३:५९ वाजेपर्यंत).
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत MPSC संकेतस्थळावर उपलब्ध सुधारित अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

