(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ओरी नं. १ येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी समर्थ राजेश जोशी याने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत रत्नागिरी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समर्थच्या या यशामागे त्याची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन आणि वर्गशिक्षक श्री. रामदास चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली.
समर्थच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत (बंड्या) देसाई, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष वसंत जाधव, खालगाव बीटच्या विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते, ओरी केंद्राचे केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच सर्व पालक आणि ग्रामस्थांनी त्याचे, त्याच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. रामदास चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

