( मुंबई )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे राज्यातील विविध विभागांतील तब्बल 2,619 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 जुलै 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून, संयुक्त पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर 2026 पासून संगणक आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाणार आहे.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. लिपिक-टंकलेखक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक यांसह विविध संवर्गातील पदांसाठी ही भरती होणार आहे.
MPSC Group C 2026: पदनिहाय रिक्त जागा
- लिपिक-टंकलेखक (मंत्रालयीन विभाग व इतर शासकीय कार्यालये) – 1,864 पदे
- सहायक मोटार वाहन निरीक्षक (गृह विभाग) – 461 पदे
- कर सहायक (वित्त विभाग) – 282 पदे
- उद्योग निरीक्षक (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग) – 9 पदे
- तांत्रिक सहायक (वित्त विभाग) – 3 पदे
एकूण पदे : 2,619
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरू: 27 जून 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 जुलै 2026
- ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 17 जुलै 2026
- चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 20 जुलै 2026
- पूर्व परीक्षा: 27 सप्टेंबर 2026 (CBT पद्धतीने)
शैक्षणिक पात्रता
- सर्वसाधारणपणे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.
- उद्योग निरीक्षक पदासाठी अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेची पदवी आवश्यक.
- सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका अनिवार्य.
- उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
आयोगाच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2026 रोजीच्या वयानुसार पात्रता निश्चित केली जाणार आहे. आरक्षित प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा.
भरती प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षा केंद्रे आणि इतर सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये उपलब्ध आहे.

