(रत्नागिरी)
ग्रामपंचायत अधिकारी संघटना (DNE. १३६), तालुका शाखा रत्नागिरीची सर्वसाधारण सभा जिल्हा सचिव श्री. संजय दळवी यांच्या अध्यक्षतेखाली शामराव पेजे सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
सभेदरम्यान तालुका कार्यकारिणीतील रिक्त पदांसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, श्री. गणपत खरंबेळे यांची अध्यक्षपदी, श्री. आशिष खोचाडे यांची उपाध्यक्षपदी, सौ. प्रणिता सावंत यांची महिला उपाध्यक्षपदी, श्री. उल्हास कोळी यांची सचिवपदी तसेच श्री. ओंकार शिर्के यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली.
याशिवाय श्री. विष्णुदास बुंदे, श्री. हरिश्चंद्र माने, श्री. सुरेश भगत, सौ. नयना पंगेरकर आणि सौ. गौरी नेवरेकर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तसेच श्री. विजय तुकाराम बेंद्रे यांची रत्नागिरी तालुका संचालकपदी निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा संघटक सौ. आशा शितोळे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी आणि सभासद उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सभेच्या शेवटी संघटनेच्या विविध प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत अधिकारी वर्गाच्या विविध समस्या, संघटनात्मक बळकटीकरण आणि भविष्यातील उपक्रमांबाबत विचारविनिमय करून सभेचा समारोप करण्यात आला.

