(चिपळूण)
शिवसेना नेते, माजी पालकमंत्री तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या रावळगाव येथील सुर्वेवाडी–होळीचामाळ पाखाडी विकासकामाचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या विकासकामाचे भूमिपूजन व शुभारंभ उमरोळी जिल्हा परिषद सदस्य पिंट्या शेठ निवळकर, चिपळूण पंचायत समितीचे शिवसेना गटनेते गौरव पाटेकर आणि शिवसेना रामपूर विभाग प्रमुख संदीप घाग यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमावेळी ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाखाडीच्या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधेत मोठी सुधारणा होणार असून परिसराच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची मागणी पूर्ण होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
ग्रामस्थांनी आमदार भास्करराव जाधव यांचे आभार मानत विकासकामांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे कौतुक केले. तसेच हे काम मंजूर होण्यासाठी आणि प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे समाजसेवक शशिकांत चव्हाण यांचेही विशेष आभार ग्रामस्थांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास शाखाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य गणपत सुर्वे, सुभाष चव्हाण, उपशाखाप्रमुख विलास जाधव, मारुती चव्हाण, शिवाजी जाधव, मोहन जाधव, विजय चव्हाण, श्रीधर चव्हाण, प्रकाश चव्हाण, दीपक सुर्वे, अनंत चव्हाण, प्रभाकर सुर्वे, अमित सुर्वे, मंगेश सुर्वे, गोविंद शिंदे, गोपीनाथ देसाई, एकनाथ सुर्वे, भिकाजी सुर्वे, सुरेश जाधव, शशिकांत चव्हाण, सविता कदम, शोभा चव्हाण, वैशाली चव्हाण, प्रवीण सुर्वे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
सुर्वेवाडी–होळीचामाळ परिसराच्या विकासाच्या दृष्टीने हे पाखाडी काम महत्त्वपूर्ण मानले जात असून भविष्यातील विकासासाठीही हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

