(रत्नागिरी / वार्ताहर)
सीबीएसई बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. शाळेमध्ये पहिल्या पाच जणांमध्ये येण्याचा मान पुढील विद्यार्थ्यांनी मिळविला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. किर्ती कुर्टे 97.20 द्वितीय क्रमांक कु. अथर्व जाधव 95.00 तृतीय क्रमांक कु. वर्धन पवार 90.00 चतुर्थ क्रमांक कु. विजय येमुळवार 89.40 पाचवा क्रमांक कु. मोहम्मद ईशान सोलकर 87.00 यांचा समावेश आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनिया सेठी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शाळेतील शिक्षक वर्गातून सुद्धा अभिनंदन करण्यात आले.

