(दापोली)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरचा गणपती मंदिर चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहे. मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडत त्यातील रोकड रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची हालचाल कैद झाली असून त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

