(चिपळूण)
तालुक्यातील खेर्डी परिसरात तळागाळातील लोकांशी घट्ट नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले उमेश खताते यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुंबईतील ‘नंदनवन’ या निवासस्थानी पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात, उमेश खताते यांनी सुमारे साडेतीनशेहून अधिक कार्यकर्त्यांसह शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “उमेश खताते हे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यात संघटना अधिक मजबूत होईल. पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी असेल आणि त्यांचा राजकीय प्रवास उज्ज्वल राहील.”
या प्रवेशावेळी उमेश खताते यांच्यासह विजय शिर्के, ओंकार पंडित, दीप्ती सावंत-देसाई, इकबाल बेबाल, विराज खताते, समीर कदम, मुराद चौगुले, वहाब बेबाल, सुमित भुरण, संदेश शिगवण, संतोष मिरगल, प्रफुल चाळके, अमित कांबळी, अमन कडवेकर, मुबारक सकवारे, अनिल पाटील, सचिन धांडे, लक्ष्मण शेळके, सुमेध भुरण, दीप्ती भुरण, साहिल भुरण, अखिलेश खेडेकर, रुपेश खताते, मयूर भालेकर, मंगेश भुरण, शुभम महाडिक, विशाल खताते, स्वप्नील जंगम, सुशील संगम, मंगेश गायकवाड, शुभम मिरगळ, योगेश खताते, सुमित खेडेकर, शौकत चौगुले, ओंकार जंगम, निनाद नाचरे, वेदांत कदम, सारिका कदम, शिल्पा खताते, स्वाती खताते, मनिष खताते, अनिल शिगवण, अमये शिगवण आदी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या सोहळ्यासाठी भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी आमदार राजन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांचे स्वागत केले.

