(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे पेजेवाडी येथे तरुण विकास मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. आज दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी ११ वाजता सुस्वर भजन तर दुपारी १२ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
रंगभरण स्पर्धा (मोठा गट) – प्रथम आयुषा दिलीप पेजे, द्वितीय अद्विवता अनिल पोतदार, तृतीय श्रद्धा जितेंद्र सुतार.
रंगभरण स्पर्धा (लहान गट) – प्रथम साई संदीप शेलार, द्वितीय स्वरा निकेत बिजै, तृतीय वेदिका विकास लाखण.
वक्तृत्व स्पर्धा – प्रथम अन्वी सुरेंद्र लिंगायत, द्वितीय सिया प्रमोद माईन, तृतीय हषा राजेश गिजबिले.
तसेच भोवती व क्रिकेट स्पर्धाही यशस्वीरीत्या पार पडल्या.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित तरूण विकास मंडळ पेजेवाडी शिवार आंबेरे मुंबई अध्यक्ष अनंत बाळू पेजे, सचिव सुयकांत नारायण पेजे, खजिनदार भरत कृष्णा पेजे, ग्रामिण अध्यक्ष सुभाष तानू पेजे, सचिव अनंत यशवंत पेजे, खजिनदार सुरज नारायण पेजे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सरपंच जितेंद्र शिसैकर, सौजन्य – कु.अया सोनाली सुदेश नाटेकर, परीक्षक- दयानंद लाखण, गोपाळ रोकडे, दिवाकर तरळ, विशेष सहाय्यक कौस्तुभ धनावडे, सुयकांत पेजे, नंदकिशोर पेजे, अक्षय पेजे, भरत पेजे, दिलीप पेजे, समीर पेजे, शिवार आंबेरे पोलीस पाटील सुदेश नाटेकर, वाडीतील गामस्थ उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र शिरसेकर यांनी आपल्या मनोगतात मंडळाच्या ३८ वर्षांच्या कार्याचा गौरव करत, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले व मंडळाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुदेश नाटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनंत पेजे यांनी केले.
(छायाचित्र: दिनेश पेटकर, गावखडी)

