(दापोली)
दापोली-खेड मार्गावरील उन्हवरे फाट्याजवळ आज पहाटेच्या सुमारास दुचाकीचा भीषण अपघात होऊन एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव) आणि अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड) हे दोघे आज (३१ मार्च २०२६) रोजी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास अॅक्टिव्हा दुचाकी ( MH 08 BF 3766) वरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले.
या अपघाताची माहिती पहाटे सुमारे ५ वाजता पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांनाही तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच नरेश रुके यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, गंभीर जखमी अमित माने यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी दापोली पोलिस अधिक तपास करत आहेत.

