(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव मधली गोताडवाडी येथील हनुमान मंदिराच्या स्थापनेला यावर्षी. ५० वर्षे पूर्ण होत असल्याने या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मधली गोताडवाडी खालगांवतर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता जन्मोत्सव अभिषेक ,आरती व भोवत्या, दर्शन आणि तीर्थप्रसाद, दुपारी २ ते सायंकाळी ६.३० पर्यंत महिलांसाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा व हळदीकुंकू असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ७ वा.लहान मुलांचे फनी गेम्स, रात्री ९ वा.नित्य आरती व भोवत्या.
३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता नित्य आरती, दर्शन व तीर्थप्रसाद सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत महाप्रसाद, नित्य आरती भोवत्या, रात्री ९ वा. स्वागत समारंभ तर रात्री ठीक १०.३० वाजता प्रसिद्ध लेखक सचिन शितप लिखित व दिग्दर्शित एक होतं गांव ही दोन अंकी सामाजिक नाट्यकृती सादर केली जाणार आहे. सादरकर्ते कलाकार हनुमान सेवा मंडळ मधली गोताडवाडी येथील आहेत.
तरी भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान सेवा मंडळ श्री देव हनुमान मंदिर मधली गोताडवाडी मुंबई व ग्रामीण तसेच वीर हनुमान महिला मंडळ खालगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

