(गणपतीपुळे / वैभव पवार)
ईगल फौंडेशनच्या वतीने रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड ता. जि. रत्नागिरी येथे रविवार दि. 8 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वा.करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, डीवायएसपी राधिका फडके प्राथमिक शिक्षणाधिकारी निलीमा नाईक, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील, जि.प.सदस्या नेत्रा ठाकूर, ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात सौ. वैदही रानडे (रत्नागिरी ),श्रीमती शैला गंगाधर बैसाणे (जळगाव ), सौ. भाग्यदेवी बाबुराव चौगले (सांगली), सौ. प्रियांका अविनाश नाईक (मुंबई ), प्रा. सौ. सुमेधा सावळ (सिंधुदुर्ग), सौ. रुपाली विक्रम यादव (शिराळा), सौ. सुनिता विजय अरगडे (पुणे), श्रीमती सुनिता रविंद्र परमणे (कागल), शोभाताई निवृत्ती होनमाने ( देवराष्ट्रे), प्रा. अश्विनी संजय पाटील ( कराड), ॲड.स्नेहल भिमराव गुरव ( कोल्हापूर ), व सुलक्षणा आनंदा कांदळकर ( राधानगरी ), स्नेहल संजोग खातू ( रत्नागिरी ) यांचा विशेष सन्मान होणार आहे.
या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, पदाधिकारी प्रकाश वंजोळे, बाबासाहेब राशिनकर, हणुमंत कदम सर, पत्रकार राजेश जोष्टे, शिरीष कुलकर्णी, शेखर सुर्यवंशी, प्रशांत चव्हाण, दिपक पोतदार, दिनेश कांबळे, सुनील पवार, विजय जगताप, वैभव पवार, मुख्याध्यापक पांडूरंग नाईक, ईगल न्यूजच्या संपादिका सौ. शालन कोळेकर, सौ. पुष्पावती वंजोळे, सौ. सुलक्षणा राशिनकर आदींनी केले आहे.

