(मुंबई)
होळी आणि शिमगा हा कोकणातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक मानला जातो. मराठी वर्षाच्या सांगतेच्या काळात साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी हजारो कोकणवासी आवर्जून गावी जातात. वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ने प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण मार्गावर अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेकडून पनवेल – रत्नागिरी दरम्यान 6 फेऱ्यांची अनारक्षित मेमू (MEMU) विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार असून, याशिवाय दिवा – चिपळूण मार्गावरही विशेष गाड्या धावणार आहेत.
पनवेल–रत्नागिरी विशेष मेमू ट्रेनचे वेळापत्रक
ट्रेन क्रमांक 01157 (पनवेल → रत्नागिरी)
-
27 फेब्रुवारीपासून सेवा सुरू
-
28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पनवेलहून दुपारी 4.40 वाजता सुटेल
-
रात्री 11.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल
ट्रेन क्रमांक 01158 (रत्नागिरी → पनवेल)
-
27 फेब्रुवारीपासून सेवा सुरू
-
28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी रत्नागिरीहून सकाळी 9 वाजता सुटेल
-
दुपारी 4.10 वाजता पनवेलला पोहोचेल
या मेमू गाड्यांना एकूण 8 डबे असतील.
पनवेल–रत्नागिरी मेमूचे प्रमुख थांबे
सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे-वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, कडवई, संगमेश्वर रोड, उक्शी आणि भोके.
दिवा–चिपळूण विशेष मेमू सेवा (2 ते 8 मार्च)
ट्रेन क्रमांक 01159 (दिवा → चिपळूण)
-
2 ते 8 मार्चदरम्यान दररोज
-
दिवाहून रात्री 11.25 वाजता सुटेल
-
दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता चिपळूणला पोहोचेल
ट्रेन क्रमांक 01160 (चिपळूण → दिवा)
-
2 ते 8 मार्चदरम्यान दररोज
-
चिपळूणहून दुपारी 3.30 वाजता सुटेल
-
रात्री 11.10 वाजता दिव्याला पोहोचेल
(अपडेट : कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण – दिवा – चिपळूण मार्गावरील मेमू अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ च्या धावण्याच्या प्रारंभ तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११६० ही चिपळूण येथून पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ०१ मार्च २०२६ पासून धावणार होती; मात्र सुधारित नियोजनानुसार ती आता ०२ मार्च २०२६ ते ०८ मार्च २०२६ या कालावधीत धावेल. त्यानुसार दिवा येथून सुटणारी गाडी क्रमांक ०११५९ च्याही सेवेत तदनुरूप बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित तारखांची नोंद घेऊन आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवाशांनी Indian Railwaysच्या https://www.indianrail.gov.in/enquiry/ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे)
दिवा–चिपळूण गाडीचे थांबे
निळजे, तळोजा पाचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे-वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.
होळीसाठी देशभर 186 विशेष गाड्या
होळी आणि शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे कोकणासह देशभरात एकूण 186 विशेष गाड्या चालवणार आहे. यापैकी 94 गाड्या होळीसाठी विशेष असून उर्वरित नियमित स्वरूपातील आहेत. या विशेष गाड्यांचे तिकीट आरक्षण 18 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष रेल्वे सेवा मोठा दिलासा ठरणार असून, होळी-शिमगा सणासाठी गावाकडे जाण्याचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.

