(रत्नागिरी)
मालगुंड (जोशीवाडी) येथील राजे ग्रुपतर्फे यंदा शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मंडळाच्या स्थापनेला यंदा १३ वे वर्ष पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाची सुरुवात आज (बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी दौड ज्योत (रत्नदुर्ग किल्ला ते मालगुंड) या उपक्रमाने होणार आहे. त्याच दिवशी रात्री १० वाजता लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पुष्पहार व शिवपूजन, सकाळी १० ते १२ या वेळेत फनी गेम्स, दुपारी ३ वाजता हळदीकुंकू समारंभ तर दुपारी ४.३० वाजता रॅली (ग्रामपंचायत मालगुंड ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर) काढण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता नमन कार्यक्रम सादर होणार असून, कोकण नमन कलामंच, रत्नागिरी यांचा सहभाग असणार आहे.
या शिवजयंती उत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बाबा आग्रे (अध्यक्ष), श्री. संजय दुर्ववळी, श्री. महेश फडकले (उपाध्यक्ष), श्री. निलेश भातडे (कार्याध्यक्ष) व श्री. नितीन भातडे (खजिनदार) हे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

