(नवी दिल्ली / मुंबई)
महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांमध्ये महायुतीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, राज्यातील मतदारांनी केवळ तीन जिल्हा परिषदांमध्येच एकहाती सत्ता दिली असून, उर्वरित नऊ ठिकाणी त्रिशंकू निकाल लागले आहेत.
भाजपाला सर्वाधिक जागा, पण सत्ता फक्त सोलापुरात
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी, स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात त्यांना केवळ सोलापूर जिल्हा परिषदेतच यश मिळालं. उर्वरित कोणत्याही जिल्हा परिषदेत भाजपाला एकहाती बहुमत मिळू शकले नाही. इतर पक्षांची स्थितीही साधारणतः अशीच राहिली आहे. या निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट जनादेश मिळालेला नाही.
या निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट जनादेश मिळालेला नाही.
नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर आता १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भाजपा व महायुतीने वर्चस्व सिद्ध केलं आहे. राज्यातील १२ पैकी १० जिल्हा परिषदांवर स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या मदतीने महायुतीची सत्ता स्थापन होणार असून, उर्वरित दोन जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू स्थिती असली तरी बहुमत मिळवण्यासाठी महायुतीने रणनीती आखली आहे.
या निवडणुकीत लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक २३ जागा जिंकल्या असून, तेथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, भाजपाने राष्ट्रवादीसोबत युती केल्यामुळे काँग्रेसला सत्तेपासून थोडक्यात दूर राहावं लागणार असल्याचं चित्र आहे.
शहरी भागात नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये यश मिळवल्यानंतर, भाजपाने ग्रामीण भागातही आपली ताकद दाखवत १२ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक कायम ठेवला आहे. काँग्रेसला लातूरमध्ये मोठं यश मिळालं असलं, तरी कोल्हापूर आणि सांगली येथे सध्या त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, मात्र या दोन्ही ठिकाणी सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची राज्यभर पिछेहाट झाली असून अवघ्या सुमारे ५० जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अजित पवार गटाशी आघाडी करूनही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेलं नाही, मात्र सांगली जिल्हा परिषदेत शरद पवार गट सर्वांत मोठा पक्ष ठरल्यामुळे तेथील सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. काँग्रेससह इतर पक्षांना सोबत घेत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, १२ जिल्हा परिषदांपैकी ७ ठिकाणी भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. शिवसेना (शिंदे गट) रत्नागिरी आणि रायगडमध्ये नंबर एकवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुण्यात अव्वल स्थानी आहे. कोल्हापूर आणि लातूरमध्ये त्रिशंकू स्थिती असली तरी, भाजप आणि महायुतीकडून बहुमताचा जुगाड करून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या निकालांमुळे ग्रामीण महाराष्ट्रातही महायुतीचं वर्चस्व अधिक मजबूत झालं असून, आगामी राजकीय समीकरणांवर या निकालांचा मोठा परिणाम होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
महायुतीच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
महायुतीला मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर पोस्ट करत महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची X पोस्ट
“पुन्हा एकदा महाराष्ट्राने भाजपा आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील यशानंतर, जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे सरकार हवे आहे, हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील तमाम बंधू-भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. तसेच एनडीएच्या सुशासनाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
जिल्हा परिषद निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हा जनतेचा आमच्यावरचा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ग्रामविकासासाठी जे भरीव काम केलं, ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला, विविध विकास योजनांमधून सकारात्मक वातावरण निर्माण केलं, त्याचा परिणाम आज दिसून येतो. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला असून, त्याचाच हा निवडणूक निकाल आहे.”

