(दापोली)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ दापोली च्या शिष्टमंडळाने, राज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करीत निवेदन सादर केली. शिक्षणसेवक यांचा शिक्षणसेवक कालावधी रद्द करणे शक्य नसल्यास किमान कमी करण्यासंबंधी विचार व्हावा यासाठी त्यांचे प्रतिनिधी सागर वाघ आणि महिला प्रतिनिधी कोमल पोकळे यांच्या नेतृत्वात मंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षणसेवक प्रश्न संबंधी सखोल चर्चा केली. यावेळी संदीप जालगावकर, जीवन सुर्वे, गणेश तांबिटकर यांनी सहकार्य केले. यावेळी ५० शिक्षणसेवक बांधव उपस्थित होते. तर सकाळ सत्रातील शाळांबाबत शिक्षक संघाचे वतीने निवेदन देत सोबत रायगड zp चे पत्र दाखवून योग्य ती चर्चा केली. यावर तत्काळ शाळांच्या वेळेत बदल करण्यात येईल असे सांगत लवकरच बदलाचे पत्र निघेल असे आश्वासित केले.
तसेच १६ मार्च रोजी होणार्या जिल्हा अधिवेशनासाठी मंत्रीमहोदयांना निमंत्रण देण्यात आले. दरम्याने शिक्षकांचे हितासाठी आपण सदैव सोबत असल्याचे नामदार योगेश कदम यांनी सांगितले.
जिल्हा सरचिटणीस संदीप जालगावकर यांचे सोबत सल्लागार जीवन सुर्वे, तालुका सरचिटणीस गणेश तांबिटकर, कोषाध्यक्ष महेंद्र खांबल, संपर्क प्रमुख महेश गिम्हवणेकर, प्रसिद्धी प्रमुख बाबू घाडीगावकर, देपोलकर, विलास साळुंके, आनंद रोहे व ५० नवीन शिक्षकबांधव उपस्थित होते.